न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- मावळात चौथ्या दिवशीही करोनाचा रुग्ण आढळून आला आहे. घाटकोपर येथून आलेल्या तळेगाव दाभाडे येथील राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीची करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तसेच चांदखेड गाव येथील १३ आणि १४ वर्षाच्या दोन मुलांना देखील करोनाची लागण झाली असल्याची माहिती तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी शुक्रवारी (दि. २२) दिली. त्यामुळे मावळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.