न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- रहाटणीतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माता रमाई स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
माता रमाई यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, विनम्र अभिवादन करण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले यावेळी लेखक बी.स. कांबळे उपस्थित होते.