न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य केशव घोळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापुर जिल्हा मित्र मंडळाचे पांडुरंग पाटील, जगदीश परीट , मिलिंद वेल्हाळ, सुनिल पाटील, नामदेव शिंत्रे आदी उपस्थित होते.
त्यानंतर चिंचवड येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयासही महापार उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे म, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य केशव घोळवे, माजी नगरसदस्य मारुती भापकर , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , कार्यकारी अभियंता सुनिल वाघुडे , माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , कोल्हापुर जिल्हा मित्र मंडळाचे पांडुरंग पाटील , कुशाग्र कदम , जगदीश परीट , मिलिंद वेल्हाळ , सुनिल पाटील , नामदेव शिंत्रे आदी उपस्थित होते.