न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- पिंपरी-चिंचवड शहरात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोशल डिस्टंसिंगसह मास्कचा वापर आदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १६ हजार ४०० पेक्षा अधिक नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.
मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्या आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकानं उघडी ठेवणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.