- उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या विश्वनाथ उर्फ बाळा आंबोले यांची बिनविरोध निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- सुदुंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथ उर्फ बाळा आंबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचे उपसरपंच ताराचंद गाडे यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला.
रिक्त झालेल्या जागेवर सरपंच सुनीता गाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत विश्वनाथ आंबोले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती माळी यांच्याकडून उपसरपंचपदी आंबोले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा झाली.
यावेळी मावळते उपसरपंच ताराचंद गाडे, ग्रामपंचायत सदस्य, उमा शेळके, मिनीता गाडे, कांता गाडे, मोनाली दिवेकर, चंद्रभागा कडूसकर, प्रवीण गाडे, लक्ष्मण भांगेसह माजी सरपंच माणिक गाडे, माजी उपसरपंच जालिंदर गाडे, माजी उपसरपंच मोहन काळडोके, सुरेश गाडे, राजेंद्र गाडे, बापू दरेकर, माजी चेअरमन सोपान गाडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.