न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२०) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा जुनिअर कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०१९ – २० या वर्षाच्या इयत्ता १२ वी च्या ९८.६० टक्के निकालाने पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे :-
विज्ञान शाखेतून प्रथम – पियुष राहुल बोरा ९१.८५ टक्के, व्दितीय बेग मैमूना मिराज अक्खतर – ९०.१५ टक्के, तृतीय कौशल सुरेंद्र रानडे ८९.२३ टक्के, वाणिज्य शाखेतून प्रथम – अनंता अनिमेश भट्टाचार्यजी ९१.३८ टक्के, व्दितीय – दर्शी मनोज सायनी ८९.२३ टक्के, तृतीय – रितिका राजू कुरलप ८८.३१ टक्के तर कला शाखेतून – प्रथम – रुचिता अशोक कलाल ८९.६९ टक्के, व्दितीय – मोहिनी अनिल गुप्ता ८२.९२ टक्के, तृतीय – श्रद्धा उमेश सरोलकर ८२ टक्के असे विशेष यश मिळवून या विद्यार्थांनी परीक्षेमध्ये बाजी मारली. त्याचबरोबर गणित विषयात अथर्व प्रविण कुऱ्हाडे याला १०० पैकी १००
गुण आणि अनंता अनिमेश भट्टाचार्यजी हिला जर्मन विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. अथर्व कुऱ्हाडे व अनंता भट्टाचार्यजी या दोन विद्यार्थांनी अनुक्रमे गणित व जर्मन या विषयात पुणे विभागातून प्रथम येण्याचा मान मिळविला.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच इतर सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रशासन अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.