- देहूरोड येथे कुटुंबीयांकडून रुग्णवाहिका कर्मचारी व प्रशासनासोबत हुज्जत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जुलै. २०२०) :- दोन मुलींना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. अधिक उपचारासाठी रुग्णवाहिका या मुलींना घेऊन जाण्यासाठी आली. मात्र, संबंधित मुलींच्या कुटुंबीयांनी आमच्या मुली करोनाबाधित नाहीत, असं म्हणत त्यांना जाऊ देण्यास विरोध केला.
त्यामुळे रुग्णवाहिकेबरोबर आलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना तसेच विनारुग्ण माघारी परतावे लागले. ही घटना शनिवारी रात्री देहूरोड परिसरातील पारशी चाळ येथे घडली.
दरम्यान, आज (रविवारी) दुपारी त्यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन जात साडेबाराच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.