न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- भोसरी येथील दोन वेगवेगळ्या घटनेत वाहन चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दापोडी आणि धावडेवस्ती येथून चोरट्यांनी दोन वाहने चारून नेली. आफाक राहील शेख यांची रिक्षा (एमएच १२ क्युआर ४२९२) दापोडी येथील बिकनसेठ पार्क येथे पार्क केली होती. २६ ते २७ जुलै दरम्यान लॉक तोडून चोरटयांनी ती लंपास केली. रिक्षा चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे.
वाहनचोरीची दुसरी घटना धावडेस्ती येथे घडली. श्रीकांत हनुमंत मुडे यांची दुचाकी (एमएच १४ एचएफ ४९९७) राहत्या घराजवळून चोरट्यांनी लॉक तोडून लंपास केली. तसेच, २०११ मधील एक जुनी रिक्षाही चोरुन नेली. घटनेचा तपास भोसरी पोलिस करीत आहेत.