- कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १० ऑगस्ट) रोजी ४२८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात इंद्रायणीनगर (पुरूष वय ५०), दिघीरोड, भोसरी (पुरूष वय ७८), पिंपळे गुरव (पुरूष वय ४५), चिंचवडगाव (पुरूष वय ६५), रूपीनगर (पुरूष वय ५२), देहूगाव (पुरूष वय ८०), निगडी (पुरूष वय ७५), चिखली (पुरूष वय ५१), (स्त्री वय ८०) पिंपरी, (स्त्री वय ४९) संभाजीनगर, (स्त्री वय ३५) रूपीनगर, (स्त्री वय ६७) सांगवी यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २९८३६ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ५१४६ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ४९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २१२०८ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.