- चिखलीतील आयआयबीएम कॉलेजमध्ये गांधी जयंती ऑनलाइन साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेजमध्ये आज शुक्रवार (दि. २ ऑक्टोबर) रोजी महात्मा गांधी जयंती कोविड-१९ विषाणुमुळे ऑनलाइन साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेवक कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते (युवानेते) विनायक (आबा) मोरे, आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत, प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, संतोष घाडगे, सौरभ भागवत, किरण वाघमारे व सर्व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते सुरक्षित अंतरात शासकीय नियमांचे पालन करून महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. दरम्यान यावेळी कॉलेजच्या आवारात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. विभागप्रमुख तसेच सर्व शिक्षकांनी कॉलेजचा सर्व परिसर स्वच्छ केला.
कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांनी विद्यार्थांना महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची थोडक्यात माहिती सांगितली. ज्या पद्धतीने गांधीजीनी अहिंसेचा मार्ग निवडला होता. तसाच विचार आपणही केला पाहिजे. आपल्या मनामध्ये गांधी विचार अवलंबला पाहिजे, असा संदेश विद्यार्थ्याना दिला.
कार्यक्रमामध्ये कॉलेजचे संस्थापक धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, विभागप्रमुख डॉ. तेजस्विनी गायकवाड यांनी ऑनलाइनद्वारे आपली उपस्थिती दर्शविली व सर्व विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे विद्यार्थ्याना ऑनलाइन प्रक्षेपणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. विश्वगंधा कुंभार तसेच आभार प्रदर्शन प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ यांनी केले.