- आज ६२४ जणांना कोरोनाची बाधा तर, २१ जणांचा मृत्यु; १०४० जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ०२ ऑक्टोबर) रोजी ६२४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे १३ पुरुष – कुदळवाडी (४५ वर्षे), तळवडे (८३ वर्षे), मिलिंदनगर (६३ वर्षे), आकुर्डी (५५ वर्षे), काळेवाडी (२१ वर्षे, ५४ वर्षे), पिंपरी (३९ वर्षे), थेरगांव (४५ वर्षे), संत तूकाराम नगर, पिंपरी (६५ वर्षे), बोपखेल (४५ वर्ष), सांगवी (वर्षे, २७ वर्षे), चिंचवड (५० वर्षे), व १ स्त्री कासारवाडी (२४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले सहा पुरुष रुग्ण हे गावडेवाडी (७५ वर्षे), धुळे (६४ वर्षे), आंबेठाण (७७ वर्षे), खेड (८० वर्षे व, चाकण (६० वर्षे), १ स्त्री – जुन्नर (५४ वर्षे) येथील रहिवासी आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांद्वारे १८७९२१७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १३०४ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता २८६ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांद्वारे १९७९७४३ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १५४१ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ३६३ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७९३३८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७२१६४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १३३७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.