न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२०) :- अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने रुपीनगरमधील आरबीएल बँकेचे एटीएम फोडून ७ लाख ९९ हजार ९०० रुपयांची रोकड पळवली.
आज रविवारी (दि. ११) दुपारी तीन वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे. चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.