न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ०५ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेत समाविष्ट भागातील तळवडे, चिखली, मोशी, च-होली व डुडूळगाव येथील विकास कामांची पाहणी केली. यावेळी महिला बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, अश्विनी जाधव, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता महेश बरिदे, जे. डी. जाधव आदी उपस्थित होते.
तळवडे येथील स्मशानभूमीची सिमाभिंत, वृक्षारोपण, पाण्याची टाकी, लाईटची व्यवस्था, स्मशानभूमिसाठी शेड, पोहोच रस्ता, रंगरंगोटी, स्वच्छता गृहाची व्यवस्था, लँडस्केपींग, सुसज्ज पार्कींग इत्यादी सुविधा तातडीने देण्याबाबत महापौर यांनी अधिका-यांना सुचना दिल्या आहेत.