न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- टायटॅनिक जहाजाचा इतिहास आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारे भव्य प्रदर्शन रावेत येथील मुकाई चौकात उभारण्यात आले आहे. डी जे ॲम्युजमेंट कंपनीच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे बुधवारी (दि. ६) उद्घाटन होणार आहे.
प्रदर्शनात टायटॅनिक जहाजाची निर्मिती, पहिली सफर, मालकी आणि कॅप्टनसह विविध ऐतिहासिक माहिती पाहता येणार आहे. प्रत्यक्ष जहाजात वावरल्याचा अनुभव देणारी रचना हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
यासोबत हॅण्डलूम, हँडीक्राफ्ट, खेळणी, पुस्तके आणि खाद्यपदार्थांचे सुमारे ३५ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. लहान मुले आणि मोठ्यांसाठी विविध राइड्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी निलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


















