न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रारदार तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांसमोरच त्यांनी तक्रारदार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी पोलिसांना देखील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
ही घटना सोमवारी (दि. १९) रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सौम्या लालबिहारी यादव (वय २१) आणि सुशांत मेश्राम (दोघेही रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महिला पोलीस कर्मचारी शुभांगी राजेंद्र बाविस्कर यांनी सोमवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.