न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चार वाहने चोरीला गेल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
भोसरी एकदंत इक्विपमेंट गोल्डन आर्किड, चिखली येथून दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद पावन ज्ञानेश्वर काळे (दिघी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.
निगडी प्राधिकरण येथून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार अभिजित सीताराम शिंदे ( निगडी ) यांनी दिली. नाशिक महामार्गावरील इंद्रायणीनगर भोसरी येथून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार लक्ष्मीनारायण भवरलाल जागिड ( भोसरी ) यांनी दिली. तर, श्रीकृष्ण भगवान महाजन ( भोसरी ) यांची दुचाकी राहत्या घरापासून चोरीला गेली आहे.