- कोरोनाच्या काळात महापालिकेला मिळाला आधार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- कोरोना महामारीमुळे आर्थिक चक्रात सापडलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला केंद्र, राज्य सरकारने दिवाळी बोनस दिला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहर गटात पिंपरी पालिकेला २२ कोटी ९९ लाख ३२ हजार ७८६ रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे.
पाणी पुरवठा व व्यवस्थापन सुधारणा आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठी हे अनुदान देण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या सन २०२१-२१ करिता पहिला अहवाल आणि केंद्र सरकारचे स्पष्टीकरणात्मक झापन प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने मिलियन प्लस न सिटीझ गटाकरिता पाणी पुरवठा व व्यवस्थापन सुधारणा आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठीचे अनुदान मिळाले आहे. ३९६ कोटी ५० लाख इतके अनुदान प्राप्त झाले आहे.
हे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थाना वितरीत करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. शेजारील पुणे महापालिकेला ४१ कोटी ४६ लाख २२ हजार २८४ रुपये, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड ९५ लाख ५९ हजार ४७४ रुपये, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला ६५ लाख १६ हजार ५६ रुपये आणि खडकी कॅन्टोन्मेंटला ९३ लाख ६९ हजार १६७ रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात महापालिकेला या अनुदानामुळे मोठा दिलासा मिळाला असून, याचा उपयोग नागरिकांच्या सोयीसाठी विविध योजना आणि विकासकामांसाठी वापरता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.