- आज २१७ जणांना कोरोनाची बाधा; ७ जणांचा मृत्यू, तर १७७ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) रोजी २१७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९१९६७ वर पोहोचली आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष रुग्ण हे काळेवाडी (६६ वर्षे), रावेत (४२ वर्षे), चऱ्होली (५५ वर्षे), दिघी (६६ वर्षे), दापोडी (७० वर्षे) ०१ स्त्री पिंपरी (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. मनपा हद्दीबाहेरील खेडमधील एका ४९ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८८०३७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६२४ जणांचा मृत्यू झालेला आहे.