न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२०) :- गायीला निर्दयतेने वागवून तिच्या सडावर कोयता आणि कु-हाडीने वार केले. यात गाय जखमी झाली. चिंचोली (ता. हवेली) येथे १७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला.
बाळू विठ्ठल बालघरे (वय ४५, रा. चिंचोली, ता. हवेली) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २९) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित जाधव, सुनील लहू जाधव (दोघेही रा. चिंचोली, ता. हवेली) यांच्याविराधोत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गाय चरत असताना अमित जाधव यांच्या हरबऱ्याच्या रानात गेली. त्यावेळी गायीला निर्दयतेने वागवून आरोपी यांनी कोयता आणि कु-हाडीने तिच्या सडावर वार करून जखमी केले. यामध्ये गायीला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ४२९ प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कायदा कलम ३, ७, प्राणी संरक्षण कायदा कलम क्रिमिनल लॉ कलम ३, ७, आर्म कलम ४ (२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.