न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- बजाज फायनान्स कंपनीच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून शून्य टक्के व्याजदराने १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादी यांच्याकडून तीन लाख ६७ हजार रुपये आणि त्यांच्या मित्राकडून तीन लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर भरण्यास सांगितले.
फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने पैसे भरल्यानंतर आरोपींनी त्यांचे कर्ज मंजूर न करता तसेच खात्यावर भरलेले पैसे परत न करता विश्वासघात करून सहा लाख ६७ हजारांची आर्थिक फसवणूक केली. मोशीतील गंधर्वनगरी येथे फेब्रुवारी २०१९ ते ८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.
बापूगौडा महादेवअप्पा पोलीस पाटील (वय २६, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याबाबत रविवारी (दि. २९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अली अनिस मोहम्मद मुमताज (रा. श्रीराम पाडा, भांडुप, मुंबई) आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


















