- वडमुखवाडीच्या गंधर्व लॉजमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२०) :- वडमुखवाडी येथील गंधर्व लॉजमध्ये आरोपी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आले. फिर्यादी यांनी आरोपींना लॉजच्या पुस्तकात एंट्री करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी तू आम्हाला ओळखल नाही का, तुला लय माज आलाय का, थांब तुला दाखवतो असे म्हणत लॉजमधील सामानाची तोडफोड केली.
तसेच आम्ही या भागातील भाई आहे, कोठे तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन निघून गेले.
हा प्रकार बुधवारी (दि. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडमुखवाडी येथील गंधर्व लॉजमध्ये घडला. साहिल शहा (वय-२३ रा. गजानन महाराज नगर, दिघी), शुभम तरटे (वय-२२ रा. काटे कॉलनी नं. १, आळंदी) असे दोघांची नावे आहेत. याप्रकरणी रामेश्वर जीवन घोडके (वय-२५ रा. माऊली नगर, आळंदी रोड, वडमुखवाडी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.