- बारावीचा निकाल १०० टक्के; डॉ. दीपक शहांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२१) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे सी. बी. एस. ई. बोर्ड (दिल्ली) चा ज्युनिअर कॉलेज इयत्ता १२ वी चा १०० टक्के निकाल लागला आहे.
कॉलेजची विद्यार्थिनी हेमांगी कश्यप हिने परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावित ९५ टक्के गुण मिळविले तर, खुशी मांडोत व ईशल शेख हिने ९४.१४ टक्के गुण मिळवीत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावरील केवीन कार्तिक ह्याने ९३.१७ टक्के गुण प्राप्त केले आहेत.
कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, समन्वयिका खुश्नुमा सय्यद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.