- घटनेचा व्हिडीओ पतीसह नातेवाईकांना दाखविण्याची धमकी; बहिणीकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२१) :- एकेदिवशी घरात पती नसताना आरोपी आतेभाऊ घरी आला. त्याने बळजबरी करत बहिणीवर बलात्कार केला. त्याने मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ काढला.
तो व्हिडिओ पतीला आणि इतर नातेवाईकांना दाखवेल अशी धमकी देऊन आतेभाऊ गेल्या अडीच वर्षांपासून बहिणीवर वारंवार घरात पती नसताना बलात्कार करत असल्याचे बहिणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
ही घटना जानेवारी २०१९ ते जून २०२१ या कालावधीत घडली. बहिण पतीसह तळेगाव परिसरात राहते. ३४ वर्षीय आते भावाच्या विरोधात बहिणीने गुन्हा दाखल केला असून अद्याप भावाला अटक झालेली नाही. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धापटे या करत आहेत.