- पिस्टल आणि तीन जिवंत काडतूसे जप्त; दरोडा विरोधी पथकाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- निगडीतील टीजेएस बॅंकेजवळ आरोपी हा पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ३५ हजार ६०० रुपयांची एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतूसे जप्त केली. गणेश निंबा महाले (वय ३८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.