- तिघे गजाआड; एमआयडीसी भोसरी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२१) :- भोसरी एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर येथे किरकोळ कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीस लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या डोक्यात, हातावर, पाठीवर, कमरेवर आणि हनुवटीवर गंभीर दुखापत झाली.
हा प्रकार मंगळवारी (दि. १६) रात्री दहाच्या दरम्यान घडला. राहुल बाळासाहेब साळुंके (वय ३२, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रतीक महेंद्र तायडे (वय २२), आशिष महेंद्र तायडे (वय २५), गणेश नामदेव काळे (वय ३२), सर्व रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.