- पैसे न दिल्याने तरुणाच्या शरीरावर ब्लेडने हल्ला; पिंपरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरीतील भाटनगर येथे आरोपीने फिर्यादीला रस्त्यात थांबवले. गांजा पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र, फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर थोड्या वेळाने आरोपी हा एकासोबत आला. त्या दोघांनी पुन्हा फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
आरोपीने कपड्यातून सर्जिकल ब्लेड काढून फिर्यादी सागरच्या कपाळावर मध्यभागी, डाव्या गालावर, कानाजवळ डाव्या कानाच्या खाली, मानेवर मारून गंभीर जखमी केले. हा प्रकार २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडला.
सागर अशोक पवार (वय २५, रा. पत्राशेड लींक रोड, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी शनिवारी (दि. २७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश भाऊसाहेब कांबळे (वय २०) आणि कमलेश भाऊसाहेब कांबळे (वय २५ दोघेही रा. पत्राशेड, लींक रोड, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.