- साईटवर काम करताना नवव्या मजल्यावरून खाली कोसळला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२२) :- पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील किवळे येथील मायहोम या गृहप्रकल्पाच्या साईटवर नवव्या मजल्यावर कामगार काम करीत होता. काम करीत असताना कामगाराचा तोल जाऊन इमारतीवरून खाली पडल्याने कामगार गंभीर जखमी झाला. त्यातच या कामगाराचा मृत्यू झाला आहे.
बांधकाम साईट वर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला. रमन अखिल विश्वास (वय ३१) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. रावेत पोलीस चौकीचे पोलीस नाईक महादु विठ्ठल डामसे यांनी शुक्रवारी (दि. १४) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष दगडु माळवदे (वय ४१, रा. पुणे) व धवल कांतीलाल संघवी (वय ५१, रा. मार्केट यार्ड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.