न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- राज्य सरकारच्या महसूल कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे अ आणि ज तसेच फ विभाग रेशनिंग ऑफिसचे कामकाज गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. महसूल विभागाचे अधिकारी फोन बंद करून बसले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
अ आणि ज विभागातील १८ कर्मचारी तर फ विभागातील दहा कर्मचारी असे एकूण २८ कर्मचारी ४ एप्रिलपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे रेशनिंग कार्यालयाशी संबंधित नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे.
रेशनिंग अधिकारी नॉट रीचेबल झाल्याने आता संप कधी मिटणार याची वाट नागरिक पाहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून महूसल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी आहेत.