- दिघीतील घटना; पोलिसांकडून तिघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- घराच्या खालील ओपन पार्किंगमध्ये फिर्यादीचे वडील १७ जून रोजी रात्री ११.३० वाजता असताना त्यांच्या तोंड ओळखीचा इसम हा सिगारेट व गायछाप मागत होता. पण, त्यांनी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ वाद चालू होता. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी, त्यांचा भाऊ व आई असे गेले व आरोपीला समजावून सांगितले.
पण, त्याचा राग येऊन आरोपीची पत्नी व त्याचा मेव्हणा हे हातात दगड व बांबू घेऊन आले. फिर्यादी व त्याच्या घरच्यांवर दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच, पार्किंगमध्ये असलेली होंडा कंपनीची दुचाकी व लोखंडी बाजवर दगड मारून नुकसान केले. तसेच, घराचे दरवाजाचेही नुकसान केले. सुजित मार्कंडे (वय ३० वर्षे, रा. दिघी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजी इकर (वय अंदाजे ४० वर्षे), सुनिल (पूर्ण नाव पत्ता माहित नाही, वय अंदाजे २५ वर्षे), आशा इकर (वय अंदाजे ३५ वर्षे, सर्व राहणार दिघी) या तिघांना अटक केली आहे.