न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- भोसरी एमआडीसी येथील सेंच्युरी एंका कंपनीमध्ये आज मंगळवार (दि. २१) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली. या अगिमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहीती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचे अटोकाट प्रयत्न अगिशमन दलाच्या जवानाने केले. यावेळी कंपनीत ७७ कर्मचारी काम करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
आगीची माहीती समजताच पिंपरी येथील अग्निशमन दलाची गाडी लागलीच घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आगीने भिषण स्वरुप घेतले असल्याने तातडीने या ठिकाणी वल्लभनगर अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या, भोसरी, प्राधिकरण, तळवडे येथील अग्निशमन विभागाच्या प्रत्येकी एक गाडी,
तसेच बजाज कंपनी आणि हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन दलाची गाडी, दोन देवदूत असे एकूण १३ बंब घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. अग्निशमन दलाचे एकुण ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे यांनी दिली.










