- बिजलीनगरमध्ये ‘जय श्रीराम, जय हनुमान’च्या जयघोषात हनुमान जयंती उत्साहात साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. १२ एप्रिल २०२५) :- शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचवडगावातील बिजलीनगर येथील हनुमान मंदिरात शनिवारी (दि. १२) रोजी ‘जय श्रीराम, जय हनुमान’ अशा जयघोषात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
हनुमान मित्र मंडळ, एम.एस.ई.बी. बिजलीनगर यांच्या वतीने ‘श्रीराम व हनुमान’ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक, हनुमान चालीसा पाठ, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पूजा करण्यात आली. सूर्यदया वेळी उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांनी दर्शनसाठी रांगा लावल्या होत्या. हनुमान जन्मोत्सव निमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यास महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता भुजबळ, गणेश खिंडचे अधिक्षक अभियंता गायकवाड, कार्यकारी अभियंता मुंडे, सांगवी उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता गिरी, चिंचवड उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता देशमुख, महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे मा. सदस्य संतोष सौंदणकर, महापालिकेचे माजी पक्षनेते नामदेव ढाके, शाम वाल्हेकर, हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल जोशी, उपाध्यक्ष विनायक पवार, किशोर चौबे, पाटील, राजेश गाढवे आणि मंडळाचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भक्त परिवार उपस्थित होता.
रविवार (दि. ६) ते शनिवार (दि. १२) या दरम्यान हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हरीनाम सप्ताह आणि पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामवंत किर्तनकारांनी सेवा दिली. तसेच भजनी मंडळांनी देखील या सोहळ्यात सहभाग घेतला. जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय ब्लडबँकच्या सहयोगाने आयोजित शिबिरात शंभर पेक्षा अधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
”समाजात प्रेमबुध्दी, सहिष्णुता आणि सात्विकता वृध्दींगत होणे गरजेचे आहे. शक्ती आणि भक्तीच मिलाप म्हणजे बजरंगबली होय, प्रभू रामचंद्रांची निःस्सीम भक्ती करुन निष्ठा कशी असावी हे भगवंत हनुमानांनी आपल्या सेवेतून दाखवून दिले आहे. हनुमंतांचा हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकृत करण्याची गरज आहे”.
– संतोष सौंदणकर,मा. सदस्य – महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती…













