न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२५) :- जुनी सांगवी येथील जयमाला नगर येथे अचानक मुख्य रस्त्यावर निंबाचे झाड आडवे पडले. त्यामुळे रहदारीचा रस्ता काही काळ बंद झाला होता. अग्निशमक विभाग घटनास्थळी दाखल झाला.
दरम्यान कटरच्या सहायाने त्यांनी झाड कापले. झाडाचे अवशेष बाजूला केले. त्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. या अपघातामुळे काही हानी झाली आहे का? याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.