- चाकणच्या नाणेकरवाडीतील घटना; व्यवसायिकाची कोटीची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १७ एप्रिल २०२५) :- जमीन विकसीत करुन प्लॉट करून विक्री करण्यासाठी दोघांनी व्यवसायिकाला दिली होती. त्यासाठी व्यवहार करून दोघांनी व्यवसायिकाकडून व्यवहारापोटी २ कोटी रुपये घेतले होते. दरम्यान व्यवसायिकाची परवानगी न घेता परस्पर सदर जमीन दुसऱ्याला देत व्यवसायिकाची एक कोटी पंधरा लाखांची फसवणूक केल्याची घटना चाकण येथील नाणेकरवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी शिवाजी रामजी बिरादार (वय ६८ वर्षे, धंदा व्यवसाय) यांनी आरोपी १) विवेकानंद वसंत शेडे रा. नाणेकरवाडी, २) सलीम मुबारक शेख, नाणेकरवाडी या दोघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल करीत आरोपी क्र २ याला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीनीमध्ये लेवल करुन डांबरी रस्ते, ड्रेनेज लाईन करुन त्यामध्ये एक दोन गुंठ्याचे प्लॉट तयार करून विक्री करण्यास व्यवसायिकाने सुरुवात केली होती. दरम्यान दोघांनी व्यवसायिकाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता विकसीत केलेली जमीन तसेच प्लॉटींग करण्यासाठी लागणा-या वैध शासकीय परवानग्या न देता. सदरची जमीन दुसर्याला विक्री करण्यासाठी दिली. सदरचे प्लॉट कोणतेही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशिररित्या विक्री करीत आहे. सदर व्यवहारापोटी दिलेले ०२ कोटी व प्लॉट करीता झालेल्या खर्चाचे तडजोडी अंती १५ लाख रुपये असे ०२ कोटी १५ लाख रुपये व्यवसायिकाला दोघांनी परत देण्याचे मान्य करून तसा लेखी करारनामा नोटरी लिहुन देवुन १ कोटी रुपये परत दिले. उर्वरित १ कोटी १५ लाख रुपये न देता व्यवसायिकाचा विश्वासाघात करुन फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार नाणेकरवाडी येथे २०२१ ते २०२३ दरम्यान घडला आहे.
















