- व्यवस्थापकसह इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२६) :- आळंदी येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे ११ कोटी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतसंस्थेच्या व्यवस्थापक व इतर आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे कर्जदार दाखवले. त्यावर सोनेतारण कर्ज मंजूर करून कर्जाची रक्कम परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. तसेच सोनार व ऑडिटर यांनीही चुकीचे अहवाल देत संस्थेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या अपहारामुळे संस्थेचे सुमारे ११ कोटी ३ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप अटकपूर्व स्थितीत आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















