न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२६) :- देहूजवळील येलवाडी परिसरात झालेल्या चाकूहल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी योगेश धाकतोडे, त्याचा मित्र ऋषिकेश पवार व शाम डांगरे हे आरोपी अमोल वाघ यांच्या घरी गेले होते. यावेळी वाद मिटवताना आरोपीने योगेश धाकतोडे याच्या उजव्या बरगडीजवळ चाकूने वार करून त्याची हत्या केली. तसेच ऋषिकेश पवार याच्यावरही हल्ला करून त्याला जखमी केले.
याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अमोल वाघ याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
















