न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकासाठी सुमारे १३ कोटी ५२ लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.
या स्मारकामध्ये ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा दोन मजली पारंपारिक लाकडी वाडा जतन करण्यात आला असून यात चापेकर बंधुंच्या कौटुंबिक जीवनाचे विविध चित्रण करण्यात आले आहे. आधुनिक एआर/व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करून सजीव अनुभव देणाऱ्या घटनांचे चित्रण देखील करण्यात आले आहे.
या स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.