- राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार पक्षाची घोषणाबाजी अनं आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने दुचाकी हातगाडीवर ठेवून आंदोलन करण्यात आले.
“वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल” “नही चाहिये अच्छे दिन वापस लाव पुराने दिन” “पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे” अशा घोषणा युवकांचे वतीने देण्यात आल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले.
या आंदोलनास महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, मा. नगरसेविका प्रियंका बारसे, अरुण पवार, रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे, ओम शिरसागर, गणेश देवराम, मयूर थोरवे, साहिल वाघमारे, दानिश अन्सारी, प्रशांत जाधव, शाहिद शेख, सार्थक बाराते, सलमान शेख, समाधान अचलखांब, परवेज शेख, गणेश धावरे, कल्पना गाडगे, ताहेरा सय्यद, पुष्पा गोपाळे, चेतना मेश्राम, सचिन निंबाळकर, साकिब शेख, सिद्धांत कसबे, तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.