न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्याच्या १७ दिवसांत डेंग्यूचे ७ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.
या महिन्यात आतापर्यंत २०४७ तापाच्या रुग्णांपैकी डेंग्यूचे ७ संशयित रुग्ण आढळले आहेत. सध्या आकडेवाडीवरून डेंग्यूचा धोका कमी असल्याचे चित्र आहे. तरी पावसाळ्याच्या तोंडावर नियमित धूरफवारणी आणि औषध फवारणीही झाली नाही तर, कीटकजन्य आजारांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना वाढविण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे.















