न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या १४८ वाहनांचा जाहीर ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल आणि २ मे रोजी सकाळी दहा ते चारपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात ई-लिलाव होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.
३० एप्रिल रोजी १२६ वाहनांचा आणि २ मे रोजी २६ वाहनांचा ई-लिलाव केला जाणार आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी २२ ते २८ एप्रिल या कालावधीन www.eauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्ध नावनोंदणी करावी लागणार आहे. तसेच ही वाहने पाहण्याकरिता २१ ते २९ एप्रिल या कालावधीत तळेगाव व राजगुरुनगर एसटी आगारात आणि आरटीओच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत.

















