न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- रावेत येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना किवळे येथील गृहप्रकल्पात घरे देण्यात येणार आहेत. दरम्यान एकूण ७५५ सदनिकांसाठी आतापर्यंत एकूण ३७० जणांनी संमतीपत्र दिले असून, आवश्यक कागदपत्रेही सादर केली आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांना ३० एप्रिलपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे.
किवळे येथे अमेनिटीज स्पेसमध्ये एकूण ७५५ सदनिकांचा गृहप्रकल्प खासगी माध्यमातून राबविला आहे. त्या गृहप्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्या सदनिका १३ लाख १७८ रुपयांत लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. रावेतऐवजी किवळे
येथे सदनिका घेण्यास तयार असल्याबद्दल लाभार्थ्यांकडून संमतीपत्र घेण्यात येत आहे. संमतीपत्र आणि जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र आदी आवश्यक कागदपत्रे चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात स्वीकारली जात आहेत. कागदपत्रे उपलब्ध होण्यास अधिक वेळ जात आहे. त्यामुळे अर्ज स्वीकृतीस ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत ३७० अर्ज प्राप्त झाले
“किवळे येथील गृहप्रकल्पामध्ये ७५५ सदनिका आहेत. या सदनिकांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा बरीच कमी आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लॉटरी काढण्याची गरज भासणार नाही. मात्र, सदनिका वाटपासाठी लॉटरी काढली जाणार आहे. एप्रिल महिन्यानंतर अर्जाची छाननी करून ती प्रक्रिया राबविली जाईल”.
– अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका











