न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे (वय ५९ वर्षे) यांचे सोमवारी (दि. २१) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अत्यंत मनमिळावू स्वभाव असल्याने त्यांच्या जाण्याने महापालिकेत शोककळा पसरली आहे.
त्यांचा अंत्यविधी मंगळवारी (दि. २२) सकाळी त्यांच्या मुळ गावी अहिल्यानगर येथील प्रवरानगर मधील कोळपेवाडी येथे होणार आहे.
डॉ. ज्ञानदेव जुंधारे हे मागील वर्षी सेवानिवृत झाले होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून चिंचवडमधील बिर्ला रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुले उच्चशिक्षित आहेत.















