- किवळेतील नवनिर्मित झोपडपट्टी विरोधात प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांच आंदोलन..
- प्रशासनाचा केला विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२५) :- किवळेतील साई ओरा सोसायटीच्या बाजूला बिल्डरने अनधिकृतपणे कामगारांसाठी चाळी उभारल्या आहेत. नव्याने या भागात झोपडपट्टी तयार होत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवला आहे. त्यासाठी विकसकाने परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तिथे नव्याने झोपडपट्टी निर्माण होते की काय, अशी सोसायटीधारकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
यासाठी महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याची ओरड करीत तेथील काही स्थानिक नागरिकांनी चक्क महापालिकेतील स्थापत्य विभागात मंगळवारी शहर अभियंता यांच्या दालनाबाहेर आंदोलन केल.
नागरिकांनी विरोध केल्यानंतरही महापालिकेने ते काम रोखले का नाही. परवानगी नसताना अनधिकृत चाळी उभारल्याच कशा, असा सवाल करीत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे महापालिकेत काही काळ गोंधळ उडाला होता.
या भागातील ईडन स्पेस, साई औरा, वरदंत पार्क, व्हिजन अरोस्तो, लोटस लक्ष्मी, इंद्रा पार्क, उदय पार्क, मंगल विश्व, विठ्ठल हाईट्स सोसायटी, के टाऊनसह आदर्शनगर परिसरातील रहिवाशांनी देखील महापालिकेला निवेदन दिले असल्याची माहिती मिळत आहे.

















