न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२५) :- जबरी चोरी करुन पळून जाणाऱ्या आरोपीस तात्काळ मुद्देमालासह पकडल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वाकड पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे कौतुक करीत सन्मान केला.
दिनांक २२/०४/२०१७ रोजी पहाटे ०३:४७ वा. चे सुमारास वाकड पोलीस ठाणे येथे तक्रारदार नामे सुरेश महादेव जाधव, वय ३४ वर्षे, रा. काळेवाडी, पुणे यांनी समक्ष हजर होऊन ठाणे अंमलदार पोहवा. १७३९ आय.एस. सय्यद यांना कळविले की, तक्रारदार त्यांचे मारुती स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच १४ एचजी ५३४० ही ओला उबेर प्रमाणे पैसेंजर वाहतुकीकरिता ग्लोबल पंजाब हॉटेल, वाकड, पुणे येथे थांबलेला असताना दोन इसम हे त्यांचेकडील दुचाकीवरुन येऊन त्यांना कोयत्याचा धाक दाखवुन जबरीने त्यांचे खिशातील रोख ३१००/रुपये चोरी करुन पळून गेले आहे.
मिळालेल्या खबरीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ठाणे अंमलदार पोहवा इम्रान सय्यद व पोलीस शिपाई विक्रम भगत हे तक्रारदार यांचे मारुती स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच १४ एचजी ७३४० मधून ग्लोबल पंजाब हॉटेल कडील घटनास्थळाकडे दत्तमंदिर रोडने जात असताना त्यांना तक्रारदार यांनी वर्णन केलेप्रमाणे यामाहा आर १७ वरुन दोन संशयीत इसम विरुध्द दिशेने जात असल्याचे पाहून त्यांचे पाठीमागे जात असताना त्यांना पोलीसांची चाहूल लागताच ते पळू लागले असताना त्यांचा पाठलाग करुन सदरच्या दुचाकीला काळाखडक यामाहा शोरुमच्या समोर तक्रारदार यांनी कार आडवी केली असता पोहवा इम्रान सय्यद यांनी गाडी चालविणाऱ्या इसमास ताब्यात घेतले.
पोलीस शिपाई विक्रम भगत यांनी मागे बसलेल्या इसमाचा पळत पाठलाग केला परंतु सदरचा इसम आंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला. ताब्यात घेतलेल्या इसमाकडे एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्यास त्याचे ताब्यातील यामाहा आर १७ दुचाकी क्र. एमएच १२ केएच ५२१३ हिचेसह चाकड पोलीस ठाणे येथे आणले. ताब्यात घेतलेल्या इसमास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अरबाज ऊर्फ लाला इरफान शेख, वय २३ वर्षे, रा. स.नं. ४२, समर रेसिडेन्सी, फ्लॅट नं. १०४, कोंढवा बुद्रुक, पुणे असे सांगितले असून पळून गेलेल्या साथिदाराचे नाव राजु ऊर्फ सत्यम विरबहाद्दर सिंग, वय २४ वर्षे, रा. घोरपडी पेठ बोंबल वाडा, मोती गणपती चौक, पुणे असे सांगितले. त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदार यांचे फिर्यादीवरुन वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास चालू आहे
पोहवा. १७३९ इम्रान सय्यद व पोलीस शिपाई २४८७ विक्रम भगत यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मा. पोलीस आयुक्त. श्री विनयकुमार चौबे सारे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. सदर प्रसंगी पोलीस आयुक्त, (गुन्हे) संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, परि-२ विशाल गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पो.स्टे. निता गायकवाड हे उपस्थित होते.

















