न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२५) :- गुंगीचे औषध देवुन घरफोडी करणाऱ्या तीन नेपाळी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली असून घरफोडीचे ०४ गुन्हे उघड केले आहेत. याप्रकरणी नागे कमल बहादुर नयारण शाही (रा. बिरपथ, कमल बाजार ६, जि. अच्छाम, नेपाळ), २) नवीन बहादुर रुद्र बहादुर शाही वय २४ वर्ष, रा. राखम नगर पालिका ६, थाना दैलेख जि. दैलेख नेपाळ ३) नर बहादुर दिप बहादुर शाही वय ३८ वर्ष, रा. कृष्णनगर, भजनी ८, जि. कैलाली, नेपाळ यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राधिकरण येथे (दि. २४/११/२०२४) रोजी दुपारचे सुमारास घरकाम करणाऱ्या एका अनामिका नामक नेपाळी महिलेने फिर्यादीचा मुलगा व सुन यांना कॉफी मधुन गुंगीचे औषध देवुन घराबाहेर उभ्या अस असलेल्या अन्य साथीदारांना घरात बोलावुन त्यांच्या मदतीने घरातील तिजोरी फोडुन रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागीने असा एकुण १६,२०,०००/- रु.चा मुद्देमाल चोरून नेला होता. गुन्हयात सहभागी असलेल्या नागे कमल बहादुर नयारण शाही यास ५ दिवसानंतर हिंजवडी येथे एका पी.जी. मधुन ताब्यात घेवुन अटक केली होती. तपासात इत्तर ०४ आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. परंतु आरोपी हे गुन्हा केलेनंतर तात्काळ त्यांचे फोन बंद करुन मुद्देमालासह नेपाळ देशात निघुन गेल्याचे निदर्शनास आले होते. परंतु सदर आरोपी हे गुन्हा करण्यापुर्वी बैंगलोर कर्नाटक येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाल्याने एका पथकाने बंगलोर येथे जावुन तपास केला असता निष्पन्न आरोपीनी बंगलोर येथे सुध्दा अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याची व ते सदर ठिकाणी सुध्दा पाहिजे असल्याची माहिती मिळाली. तेव्हा सदर आरोपींचे शोधकामी त्यांचे नातेवाईकांचे फेसबुक प्रोफाईलची माहिती घेवुन त्यावरुन आरोपींचे नवीन फेसबुक व इंस्टाग्राम वरील आय.डी. प्राप्त करुन त्यावर मागील ५ महिण्यापासुन सलग लक्ष ठेवून तांत्रीक विश्लेषण सुरु ठेवले तेव्हा करत असलेल्या तांत्रीक विश्लेषणात दाखल गुन्हयातील दोन प्रमुख पाहिजे आरोपी हे बंगलोर कनार्टक परिसरात आलेले असल्याचे व ते विमानाने नेपाळ येथे परत जाण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ एका पथकास बंगलोर येथे पाठवुन त्या ठिकाणी स्थानिक पोलीस व एअरपोर्ट येथील सी.आय.एस.एफ स्टाफचे मदतीने आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान केलेल्या तपासात त्यांचे कडुन दाखल गुन्हयातील ४,०५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले असुन इत्तर दागीने हे त्यांचे इतर पाहिजे आरोपी साथीदार यांनी नेपाळ देशात विक्री केल्याचे निष्पन्न झाले असुन सदर आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. आरोपीकडुन निगडी, महालक्ष्मीपुरम, बायपनहल्ली (बंगलोर शहर कर्नाटक), चिमेनी (कासारगोड जिल्हा, केरळ) येथील गुन्हे उघडकिस आले आहेत.
आरोपींकडे सखोल तपास केला असता दोन्ही आरोपी हे घरफोडी व अशा प्रकारचे गुन्हे करणारे निष्णात गुन्हेगार असुन ते त्यांचे साथीदारांसह भारतात येवुन वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये जावुन त्याठिकाणी श्रीमंत लोकांकडे त्यातील एक जोडपे कामाला लागतात. त्यानंतर घरमालकाचा विश्वास संपादन करताच संधी साधुन इतर साथीदारांना बोलावुन घरमालकांना जेवनातुन अथवा पेयातुन गुंगीचे औषध देवुन चोरी किंवा घरमालक गावी गेले असल्यास घरफोडीचे गुन्हे करतात व त्यानंतर तात्काळ नेपाळ येथे निघुन जातात. त्यानंतर काही दिवसांनी भारतात परत येवुन वेगळ्या शहरात अशाच प्रकारे गुन्हे करतात.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ स्वप्ना गोरे, सपोआ चिंचवड विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, तपास पथकाचे स.पो.नि. अंबरिष देशमुख, पोउपनि प्रतिक भिंगारदिवे व पोहवा भगवान नागरगोजे, स्वप्नील पाचपांडे, दत्ता शिंदे, सिंद्राम बाबा, शिवाजी नागरगोजे, सुधाकर अवताडे, राहुल गायकवाड, पोशि विनायक मराठे, दिपक पिसे, केशव चेपटे, प्रविण बांबळे, सुनिल पवार व मपोहवा नुतन कोंडे यांनी केली आहे.











