- डॉ. विजयकुमार पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- साडे तीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्राधिकरणातील उद्यानातील मोडकळीस आलेल्या खुल्या व्यामशाळेतील साहित्यांची आज दुरुस्ती सुरू झाली. ठाणे येथील हनी-फन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संत ज्ञानेश्वर उद्यानापासून सदरच्या दुरुस्तीच्या कामाची सुरुवात केली.
गेल्या वर्षभरापासून ओपन जीम चे साहित्य खराब झाले होते. नागरिकांना त्यामुळे ओपन जिमच्या साहित्याचा व्यायामहेतु वापर करता येत नव्हता. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर क्रीडा प्रशासनाने याची दखल घेऊन काम सुरुवात केली.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अधक्ष्य डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले महापालिकेच्या अ प्रभाग विभागाअंतर्गत ३० पेक्षा जास्त ओपन जिम येतात.त्यातील बहुतांशी उद्यान परिसरात आहेत.सकाळ व संध्याकाळी नागरिक मोठया प्रमाणात व्यायामहेतु ह्या साहित्यांचा आनंद घेत असतात.जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात ह्या साहीत्यांचा वापर करताना दिसून येत असते. त्यामुळे संत तुकाराम उद्यान ,संत कबीर उद्यान व संत ज्ञानेश्वर उद्यानासोबत इतर ठिकाणी सुद्धा उपलब्ध असलेल्या खुल्या व्यायामशाळाही पूर्वरत स्थितीत येण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत”











