न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- पहलगाम, काश्मिर येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे अनुषंगाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शांतता अबाधित राखण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होउ नये याकरिता पोलीस आयुक्त विनय कमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीत मोठ्या प्रमाणावर व्हिजीबल पोलीसिंग राबवले जात आहे.
यामध्ये पोलीस आयुक्तालयातील जास्तीत जास्त वरिष्ठ पोलीस अधिकारी व अमंलदार हे सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीचे ठिकाणे मॉल, व्यापारी संकुल, बाजार पेठ, उदयान पर्यटन स्थळे, रेल्वे बस स्थानक या सारखे महत्वाचे ठिकाणी भेटी देवून सुरक्षितेचे दृष्टीने चेकींग योग्य पदधतीने करणेबाबत सुचना देत असून तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. शहरातील मिश्श्र लोकवस्ती असलेल्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसांची दिवस-रात्र गस्त वाढवण्यात आले आहे.
पोलिसांची विविध पथके तयार करुन त्याद्वारे गोपनीय माहिती संकलीत केली जात असून चुकीचे अथवा सोशल मिडीयावर अफवा पसरविणा-या संदेशांवर पोलीस बारकाईने नजर ठेवून आहेत. धार्मिक तेढ निर्माण करणारे व प्रसारमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश प्रसारीत करणा-या नागरिकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.











