न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस अधिकारी हे (दि. ३०) रोजी सेवानिवृत्त झाले. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त यांच्या मार्गदशनाखाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार व निरोप समारंभ “शिवनेरी सभागृह” या ठिकाणी पार पडला.
त्यांच्या भावी आयुष्याकरिता व आरोग्या करिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) विवेक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन लांडगे, पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी वृदं व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.
सेवानिवृतांमध्ये पोलीस उपनिरीक्षक दशरथ यशवंत भोकसे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ रणपीसे, शरद वर्षे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, उत्तम पठारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.
















