न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२५) :- रिक्षामधील एक प्रवासी हा पीएमपीएल बसमध्ये बसला. या कारणावरुन चिडुन जावुन रिक्षा चालकाने रिक्षा पीएमपीएल बसला आडवी लावुली. पीएमपीएल बस थांबवुन पी.एम.पी.एम.एल बस चालकला ‘तुम्हा पीएमटी चालकांना खुप माज आला आहे. तुम्हाला मारल्याशिवाय समजणार नाही’, अशी धमकी देवुन, शिवीगाळ करुन लोखंडी रॉड चालकाच्या कपाळावर मारुन त्यांना दुखापत केली आहे.
हा प्रकार (दि.३०/०४/२०२५) रोजी सकाळी १०.१० वा चे सुमारास डांगे चौक, बीआरटी बसस्टॉप, वाकड येथे घडला. फिर्यादी पी.एम.पी.एम.एल चालक राहुल कांबळे यांनी आरोपी सुनिल बापु गायकवाड (वय-३५ वर्षे, धंदा-रिक्षा चालक, रा. चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.


















