न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२५) :- चिखलीतील एका बँकेत (दि.२९/०४/२०२५) रोजी सकाळी १०:४० वा. सुमारास एका बँक खातेधारकाच्या खात्यावर अज्ञाताकडून नकली नोटा भरण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
दरम्यान अडीच हजार रूपयांच्या ५०० रूपये दराच्या एकूण ५ नोटा नकली मिळून आल्या आहेत. एकूण १,४७,५०० रूपये खात्यावर भरण्यात आले. त्यात ५०० रूपये दराच्या एकूण २९५ नोटा कॅशमध्ये जमा करण्याकरीता आल्या होत्या.
याप्रकरणी फिर्यादी रोहितकुमार श्रीवास्तव, बँक मॅनेजर यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.














