न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०५ मे २०२५) :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. सुनावणी होऊन याबद्दलचा निर्णय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढच्या काही महिन्यांमध्ये लागू शकतील.
मात्र, निर्णयाला उशीर झाला तर निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यास्तव अनेक ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही.